– प्रमोद मुजुमदार, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांची सेमी ङ्गायनल म्हणून दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात होते. या पार्श्वभूमीवर समोर आलेले निकाल कॉंग्रेससाठी धक्कादायक तर भाजपाला समाधान मिळवून देणारे ठरले आहेत. त्याचबरोबर यावेळी प्रथमच राजकीय क्षितिजावर झालेला आम आदमी पार्टीचा उदय अन्य राजकीय पक्षांना कोड्यात पाडणारा ठरला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा दणदणीत पराभव करून कॉंग्रेससह सार्यांनाच धक्का दिला. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने क्रमांक दोनचा पक्ष म्हणून स्थान पक्के केले. अशा परिस्थितीत भाजपाने सत्ता स्थापन केली तरी त्याच्यासमोर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पार्टीचे तगडे आव्हान राहणार आहे. दिल्ली विधानसभेच्या या पूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये शीला दीक्षित यांनी बाजी मारली होती. परंतु राष्ट्रकूल घोटाळ्यामध्ये सुरेश कलमाडींबरोबर शीला दीक्षितांचेही नाव घेण्यात आले. या घोटाळ्यासंदर्भात पंतप्रधानांनी सेलू समिती स्थापन केली होती. परंतु तिच्या अहवालानुसार केंद्र सरकारने कारवाईसंदर्भात कोणतीही पावले उचलली नाहीत. त्याचबरोबर दिल्लीतील निर्भया प्रकरणही शीला दीक्षितांसाठी अडचणीचे ठरले. त्यामुळे एकूणच दिल्लीत सत्ताधार्यांविरोधात लाट निर्माण झाली आणि तीच शीला दीक्षितांसाठी त्रासदायक ठरली.
या पार्श्वभूमीवर अण्णांचे प्रमुख सहकारी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यावेळी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पुरेशा ताकदीने उतरला. वीजकपात, पेट्रोल दरवाढ, वाढती महागाई हे मुद्दे या पक्षाने हातात घेतले. त्यामुळे दिल्लीत भाजप, कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत झाली. राष्ट्रकूल स्पर्धेच्या निमित्ताने दिल्लीत मोठमोठे रस्ते, उड्डाणपूल झाले आहेत. हा मुद्दा पुढे आणण्यात आला तेव्हा शीला दीक्षितांच्या चुकांवर पांघरूण घातले गेले. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली रॅली जनतेच्या लक्षणीय सहभागामुळे चर्चेत राहिली. परंतु त्याचा भाजपाला राजकीयदृष्ट्या पुरेपूर ङ्गायदा घेता आला नाही. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अनपेक्षितपणे पटकावलेल्या दुसर्या क्रमांकाच्या जागा आता अनेकांच्या विश्लेषणाचा विषय बनत आहेत. सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या शीला दीक्षित यांचा अरविंद केजरीवाल यांनी दारुण पराभव केल्यानंतर आता अरविंद केजरीवाल हे किंगमेकर ठरणार असा अंदाज बांधला जात होता. तो अखेर खरा ठरला.
जेमतेम एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने राजधानी दिल्लीत जोरदार मुसंडी मारली. अण्णा हजारेंच्या आंदोलनातील एक शिलेदार असलेल्या केजरीवाल यांनी अण्णांच्या पक्ष स्थापन न करण्याच्या भूमिकेपासून ङ्गारकत घेऊन आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारेंनी कोणत्याही राजकीय पक्षात थेट प्रवेश किंवा पक्षाला पाठिंबा देण्यास स्पष्ट विरोध केला होता. परंतु केजरीवाल यांच्यासारख्या खर्या अर्थाने राजकीय जाण असलेल्या नेत्याने कॉँग्रेस आणि भाजपाला पर्यायी पक्ष दिल्यास लोकांचा पाठिंबा मिळू शकतो हे बरोबर ओळखले आणि अण्णांपासून दूर जाऊन आम आदमी पक्षाची स्थापना केली. यामागे आणखीही एक कारण होते. ते म्हणजे जनलोकपालबाबतच्या आंदोलनादरम्यान केजरीवालांकडून जी वक्तव्ये किंवा भाषणे केली जात होती, त्यांमध्ये त्यांच्या टीकेचा रोख प्रस्थापित आणि परंपरागत पक्ष असलेल्या कॉंग्रेस तसेच भाजपावर अधिक होता.वास्तविक आपल्या देशातील लोकशाही पध्दतीनुसार कोणताही कायदा संसद तसेच विधानसभेच्या माध्यमातूनच केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अण्णांच्या आंदोलनाने प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत खासदार आणि संसदेलाही टीकेचे लक्ष्य बनवले होते.
या विषयावर उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच ‘कायदे रस्त्यावर होत नाहीत किंवा रस्त्यावरील आंदोलनातूनही निर्माण होत नाहीत. ते संसद किंवा विधानसभेच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे जनलोकपालविषयी इतका कळवळा असेल तर तुम्ही राजकारणात का येत नाही’ असे उघड आव्हान केजरीवालांना देण्यात आले. ते स्वीकारत राजकीय पक्ष निर्माणकरण्याचा केजरीवालांनी निश्चय केला आणि त्यानुसार आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आली. येथून केजरीवालांचा राजकीय प्रवास सुरू झाला. दिल्ली हे मुख्य कार्यक्षेत्र राहिलेल्या या पक्षाने सुरुवातीस केवळ भ्रष्टाचार याच विषयावर लक्ष केंद्रीत केले.परंतु जनतेच्या जिव्हाळ्याचे अन्य प्रश्नही हातात घेणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर वीजपुरवठा, विजेचे दर, पाणीवाटप व्यवस्था, रेशन व्यवस्थेतील अनागोंदी यावरही आवाज उठवण्यास सुरुवात केली. दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यातील एक असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे आम आदमी पार्टीने जाहीर केले. या पक्षाने दिल्लीतील सर्वच्या सर्व म्हणजे ७० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी २८ जागांवर या पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. स्थापनेनंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अशा पद्धतीचे यश क्वचितच एखाद्या पक्षाला लाभले असेल. राजकारणात नवखे असणार्या, परिस्थितीने साधारण असणार्या ‘आप’च्या उमेदवारांनी विरोधात उभारलेल्या दिग्गज उमेदवारांना धूळ चारली. याचाच अर्थ या जनतेने मनोमन परिवर्तनाचा निश्चय केला होता.
आणखी एक बाब. आम आदमी पक्ष हा अण्णांच्या आंदोलनाप्रमाणे या निवडणुकीत संपून जाईल असा अनेकांचा असलेला होरा दिल्लीतील यशाने खोटा ठरला आहे. या पक्षाचा नेमका पाया कोणता, या पक्षाने कोणाची मते खाल्ली असे प्रश्न अनेकांना पडतील. येत्या काही दिवसांत त्याचे योग्य विश्लेषण होईलच. हा पक्ष ङ्गक्त भाजपाचीच मते खाणार हेदेखील खोटे ठरले आहे. त्यांनी दोन्ही पक्षांची मते खाल्ली आहेत. मात्र नवशिक्षित, तरुण मध्यमवर्ग, ज्याला कॉँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा वीट आला होता असा वर्ग ‘आम आदमी’च्या मागे उभा राहिला असेच दिसते. कारण या वर्गाला एक चांगला पर्याय हवा होता. त्याला देशातील भ्रष्टाचाराबद्दल चीड आहे आणि देशासाठी काहीतरी चांगले व्हावे असे वाटणारा हा वर्ग आहे. आजवर हा वर्ग निवडणुकीत मत देण्यासाठी आवर्जून बाहेर पडला नव्हता. निवडणुकांच्या दिवशी आलेल्या सुट्टीत पिकनिकला जाण्यात तो धन्यता मानत होता. परंतु त्याला आता देशात बदल हवा आहे. आपण जो कर भरतो त्याचा योग्य विनियोग व्हावा, सर्वसामान्य लोकांसाठी दिलेला पैसा योग्यरीत्या खर्च व्हावा अशी त्याची प्रामाणिक इच्छा आहे. दिल्लीत बलात्काराच्या घटनेनंतर हाच तरुण वर्ग चिडून रस्त्यावर उतरला होता. पूर्वापार हा भाजपाचा किंवा कॉँग्रेसचा मतदार आहे. परंतु त्याने हे दोन्ही पक्षांचे कारभार पाहिले आहेत. त्यामुळेच देशात काहीतरी चांगले करण्यासाठी आम आदमी झटत आहे अशी भावना निर्माण झाल्यानेच त्याने त्यांना मतदान केले.
पक्ष स्थापन झाल्यावर लगेचच सत्तेत आल्याचे उदाहरण म्हणून जनता पार्टीकडे पाहता येईल. परंतु हा पक्ष ज्या गतीने स्थापन झाला त्याहून जास्त गतीने संपुष्टात आला. आंध्र प्रदेशातील तत्कालीन लोकप्रिय सिनेनट एन. टी. रामाराव यांच्या तेलगू देसमचे असेच उदाहरण आहे. या पक्षाने आंध्रतील सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करून सत्ता काबीज केली. परंतु त्यांना पुढच्या निवडणुकीत पराभव पहावा लागला. आसाममधील विद्यार्थी चळवळीतून स्थापन झालेल्या प्रङ्गुल्लकुमार महंतो यांच्या आसाम गण परिषदेने अशीच चळवळीच्या माध्यमातून सत्ता मिळवली होती. त्याची तुलना आता आम आदमी पक्षाशी करता येईल. मात्र हा पक्ष देशात ङ्गोङ्गावेल आणि सत्ता काबीज करेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. परंतु आम आदमी पार्टीने भाजपा नको आणि कॉँग्रेसही नको हे जे सूत्र लावून धरले ते देशात लोकप्रिय होऊ शकते. मात्र यासाठी देशपातळीवर नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. आता आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारमुक्तीची जी घोषणा दिली त्यावर आधारीत काम करण्यात त्यांची कसोटी लागणार आहे. लोकांचा संपादन केलेला विश्वास टिकवणे हे एक आव्हान असेल.
कॉंग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारे निकाल : अशोक चौसाळकर
आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या गेलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल बरेचसे अपेक्षेप्रमाणे, विशेषत: निवडणूकपूर्व चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार बरोबर ठरणारे आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने अनपेक्षितपणे मोठे यश मिळवले. यामागे अण्णा हजारेंच्या दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा भाग महत्त्वाचा आहे. परंतु त्याचे श्रेय अण्णा हजारे घेऊ शकले नाहीत असेच म्हणावे लागेल. अण्णा हजारे दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असते तर कदाचित या पक्षाला बहुमत मिळाले असते हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात कॉंग्रेस सरकारच्या भ्रष्ट कारभाराविषयीचा जनतेतील असंतोष सर्वात जास्त दिल्लीत दिसून येत होता. त्याचा आम आदमी पक्षाला ङ्गायदा झाला. राजस्थानात यापूर्वीच्या सरकारने कल्याणकारी योजनांच्या घोषणा खूप केल्या. पण त्या प्रभावीपणे अंमलात आल्या नाहीत. शिवाय कोणी काही मागितले की देत रहायचे ही वृत्तीही हितावह ठरत नाही. अशा पध्दतीने कणाहीन राज्य करणे जनतेला आवडत नाही. परंतु याकडे राजस्थानातील कॉंग्रेसप्रणित सरकारने काणाडोळा केला. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. आता या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा आगामी लोकसभा निवडणुकांवर काही परिणाम होईल का असा प्रश्न विचारला जाईल. आता भाजपाने यश मिळवलेली राज्ये त्याचे प्रभावक्षेत्र राहिलेे आहे. त्या व्यतिरिक्त गुजरातमध्ये भाजपाचा प्रभाव आहे. या सार्या राज्यांमध्ये असणार्या लोकसभेच्या जागा जिंकण्याच्या दृष्टीने आताच्या विधानसभा निवडणुकीतील यशाचा उपयोग होईल. पण तसे चित्र सर्वत्रच दिसेल असे म्हणता येणार नाही. या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी जिद्दीने पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. परंतु यातून देशात ‘मोदींची लहर’ आहे असे म्हणता येणार नाही. कारण तशी ती असती तर भाजपाला दिल्लीत यापेक्षा चांगले यश मिळाले असते. शिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील भाजपाच्या यशात शिवराज सिंह चौहान आणि वसुंधराराजे यांच्या वैयक्तिक कार्याचे योगदानही मोलाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. एकूणच विचार करायचा तर या निवडणुकांचे निकाल कॉंग्रेससाठी आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील केजरीवालांच्या यशामागील प्रमुख कारणे-
श्र आयकर विभागात जॉईंट कमिशनरपदावर कार्यरत असताना त्या पदाचा राजीनामा देऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उतरलेल्या केजरीवालांवर एकही आरोप झालेला नाही.
श्र दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची केवळ घोषणा करून केजरीवाल थांबले नाहीत तर त्या क्षणापासून त्यांनी प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली. त्यात डोअर टू डोअर प्रचारावर भर देण्यात आला. पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यास केजरीवाल मुख्यमंत्री होणार असल्याचा प्रचारही कामी आला.
श्र केजरीवालांची तीव्र इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय या बाबीही विजयासाठी सहाय्यभूत ठरल्या. विशेष म्हणजे शीला दीक्षित ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील तेथे त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवणार असल्याचे केजरीवालांनी अगोदरच जाहीर केले होते.
श्र आम आदमी पार्टीला मिळालेल्या चिन्हाचाही यशात मोठा वाटा आहे. पक्षाला मिळालेले झाडू हे चिन्ह सङ्गाई कामगारांना आपलेसे वाटलेे आणि त्यातून ही कॉंग्रेसची पारंपरिक व्होट बँक ‘आप’कडे वळली.
श्र आतापर्यंत आपणच सामान्य जनतेचे तारणहार अशा थाटात वावरणार्या कॉंग्रेसला ‘आम आदमी पार्टी’ या नावाचीही मोठीच अडचण झाली. म्हणजे अन्य पक्षांशी संवाद साधताना ‘आप की पार्टी’ असा शब्द वापरल्यास त्याचा अर्थ ‘आम आदमी पार्टी’ असा नव्हता हा खुलासा तातडीने करण्याची वेळ येत होती.
श्र दिल्लीत यावेळच्या निवडणुकीत भाजपाला ३३ टक्के मते मिळाली तर आम आदमी पार्टीला ३० टक्क्यांहून थोडी अधिक मते मिळवता आली. एवढेच नव्हे तर या पक्षाच्या उमेदवारांनी कॉंग्रेसच्या अनेक मंत्र्याचा तसेच नेत्यांचा पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला. खुद्द केजरीवाल यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या शीला दीक्षित यांचा २५,८६४ पेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील केजरीवालांच्या य