Home बातम्या राजकारणात उतरण्यास हरकत नसेल : रॉबर्ट

राजकारणात उतरण्यास हरकत नसेल : रॉबर्ट

0

सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका राजकारणात सक्रिय होण्याची चर्चा असतानाच प्रियंकाचे पती रॉबर्ट वध्रा यांनी काल आपली सक्रिय राजकारणात उतरण्याची इच्छा असल्याचे जाहीर केले. ‘‘मी येथे माझ्या मेहुण्यासाठी आलो आहे. जनतेसाठी मी काही बदल घडवू शकत असेन तर त्यासाठी राजकारणात उतरण्यास माझी हरकत नसेल’’ असे वधरा यांनी उत्तर प्रदेशमध्ये प्रचारात सहभागी झाले असता सांगितले. ‘‘मी ज्या कुटुंबातील मुलीशी विवाहबद्ध झालो आहे, ते कुटुंब राजकारणात आहे. त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहू शकत नाही. योग्य वेळ असेल तेव्हा योग्य तो निर्णय घेईन’’ असे ते म्हणाले. मात्र, आपले लक्ष्य सध्या कामावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानपदाची कमान स्वीकारण्यास राहुल गांधी सज्ज असल्याचेही वध्रा यांनी सांगितले. ‘‘तो सज्ज आहे, परंतु शेवटी तो त्याचा निर्णय असेल. त्याचे लक्ष्य सध्या विकासाकडे आहे. राहुल गांधी तळागाळात काम करीत आहे’’ असे ते पुढे म्हणाले. अमेठी व रायबरेलीत सध्या प्रियंका व पती रॉबर्ट प्रचारात सहभागी झाले आहेत.