‘रस्ता सुरक्षा’ विषय अभ्यासक्रमात येणार

0
75

राज्यातील विद्यार्थी वर्गात रस्ता सुरक्षेबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने या वर्षीपासून ‘रस्ता सुरक्षा’ हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ष्ट करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या पर्वरी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत काल घेण्यात आला आहे.
राज्यातील सरकारी व अनुदानित मिळून १०० शाळांतून रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर शिकविण्यात येणार आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत खास अभ्यासक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली. दरम्यान, खासगी वाहनातून शालेय मुलांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.