रमेश तवडकरांना मगोतर्फे काणकोणातून उमेदवारी

0
98

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर १६ रोजी संध्याकाळी ६.३० वा. भाजपाचे उमेदवार विजय पै खोत यांच्या निवासस्थानी भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर भाजपापासून फारकत घेण्याच्या विचारात असलेल्या कार्यकर्त्यांची दिलजमाई करण्याचे काम करणार आहेत. क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना भाजपान उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सद्या तरी वेगळी चूल थाटण्याचा विचार करण्यात आल्यामुळे काणकोणची निवडणूक अटीतटीची होणार असल्याची चिन्हे बळावली आहेत.

दरम्यान, रमेश तवडकर भाजपाच्या सदस्यत्वाचा आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर म. गो. पक्षात प्रवेश करणार असून काणकोण मतदारसंघातून मगोतर्फे ते निवडणूक लढविणार आहेत. काणकोण मतदारसंघातील आदिवासी समाज संघर्षाच्या तयारीत असून, नाराज झालेले भाजपाचे सदस्य, रा. स्व.संघ आणि गोवा सुरक्षा मंचाचे कार्यकर्ते श्री. तवडकर यांना सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत.