युती न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढणार ः चर्चिल

0
58

कॉंग्रेसबरोबर युती झाली नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर ३० ते ३५ जागा लढवू शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तेवढी ताकत निश्‍चितच आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले ज्येष्ठ राजकीय नेते चर्चिल आलेमाव यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोव्यातल्या कुठल्याही मतदारसंघातून जर आपण निवडणूक लढवली तर आपणाला २ ते ३ हजार मते मिळू शकतात. त्यामुळे कुणीही चर्चिल आलेमाव यांना कमी लेखू नये, असे ते म्हणाले.

मोपला विरोध
मोप येथे होऊ घातलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपला पूर्ण विरोध असून शेवटच्या श्‍वासापर्यंत आपला या प्रकल्पाला विरोधच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. दाबोळीचा विस्तार करणे शक्य असून त्यामुळे मोप विमानतळाची गरज नसल्याचे ते म्हणाले. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे इंग्रजीच असायला हवे, या मताचा आपण आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
नद्यांचा लिलाव ः आरोप
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जुझे ङ्गिलीप डिसोझा हे यावेळी बोलताना म्हणाले, की राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पूर्ण विरोध आहे. गोवा सरकारने गोव्यातील नद्यांचा लिलाव केल्याचा आरोप डिसोझा यांनी यावेळी केला.