युती कायम ठेवण्यावर ज्येष्ठ मगो नेते ठाम

0
73

मगो पक्षाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युतीस विरोध दर्शविला असला तरी युती कायम ठेवण्यावर मगो नेते ठाम असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मगो नेत्यांनी सध्या या प्रश्‍नावर कार्यकर्त्यांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू केले असून मडकई व प्रियोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी या विषयावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार ढवळीकर बंधूंना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.