>> रशियाचा इशारा
>> चौथ्या दिवशीही देन्ही देशांत तुंबळ युद्ध
रशियाने आता युक्रेनवर अधिक तीव्र हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. काल चौथ्या दिवशीही युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरुच असून दोन्ही देशांत तुंबळ युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिण आणि आग्नेय भागातील दोन शहरांना वेढा घातल्याचा दावा केला आहे. तसेच रशियन सैन्याने खार्किव शहरातील गॅस पाइपलाइन उडवली.
रशियाने काल आता युक्रेनवर चारही बाजूंनी हल्ला करणार असल्याचे सांगत यापूर्वी कीव्हवरील कमी हल्ले केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर युक्रेनला पाश्चात्य देशांकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळाल्यानंतर रशियाने राजधानी कीव्हसह युक्रेनमधील सर्व शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत. रशियन सैनिकांकडून बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जात आहेत. शनिवारी चेर्नोबिल अणू प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर आता रशियन लष्कर आणखी एक अणू प्रकल्प ताब्यात घेण्याचा प्रयत्नात आहे.
गॅस पाइपलाइन उद्ध्वस्त
युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या सैन्याने देशातील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवमधील गॅस पाइपलाइन स्फोटाने उद्ध्वस्त केली आहे. या स्ङ्गोटामुळे पर्यावरणीय आपत्ती उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासनाने रहिवाशांना घरांच्या खिडक्या ओल्या कपड्यांनी झाकण्याचे आणि भरपूर द्रव पिण्याचा सल्ला दिला आहे.
बॉम्बस्ङ्गोटात १० ग्रीक ठार
रशियाने केलेल्या हल्ल्यात दहा ग्रीक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या मारियुपोल शहराजवळ रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात हे १० ग्रीक नागरिक ठार झाले आहेत आणि ६ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
धान्यसाठा संपण्याच्या मार्गावर
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांच्या सैनिकांकडून एकमेकांवर तुङ्गान गोळीबार सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती बिकट झाली आहे. तेथील धान्यसाठा संपत आला असल्याचे वृत्त आहे.
२५० भारतीय विद्यार्थी रोमानियाहून मायदेशी
गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. मात्र काल रविवारी सकाळी २५० विद्यार्थी रोमानियाहून सुखरुप भारतात परतले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. एअर इंडियाच्या दुसर्या विमानाने हे २५० विद्यार्थी भारतात आणले आहेत. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच शनिवारी युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर काल रविवारी २५० विद्यार्थी भारतात परतले आहेत. रोमानियाहून एअर इंडियाचे पहिले विमान या विद्यार्थ्यांना घेऊन काल रात्री साडेआठ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी विमानतळावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पंतप्रधान मोदी घेणार बैठक
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत युक्रेनने भारताकडे मागितलेल्या मदतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत काल ङ्गोनद्वारे संवाद साधत मोदींना संयुक्त राष्ट्र संघामध्ये पाठिंबा देण्याची विनंती केली होती. या चर्चेत मोदींनी शांतता पुनर्स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची भारताची वचनबद्धता व्यक्त केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मोदींनी तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी युक्रेनच्या अधिकार्यांना भारतीय नागरिकांच्या जलद आणि सुरक्षित बाहेर काढण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.