यासिन भटकळसह पाच दहशतवादी दोषी

0
52

>> हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरण

 

हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणात यासिन भटकळसह इंडियन मुजाहिदीनचे पाच दहशतवादी दोषी असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाने काल दिला. येत्या १९ डिसेंबरला न्यायालयाकडून शिक्षेची सुनावणी होणार आहे. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना दोषी ठरविण्यात आल्याचा हा पहिलाच न्यायालयीन निकाल आहे.
तीन वर्षांपूर्वी हैदराबाद येथील दिलसुखनगरमधील सिनेमागृहात झालेल्या बॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला होता व जवळपास दीडशेजण जखमी झाले होते. या कटाचा मुख्य सूत्रधार रियाझ भटकळ अद्यापही फरार आहे. यासिन भटकळला सप्टेंबर २०१३ मध्ये नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली होती. एक वर्ष तिहार जेलमध्ये ठेवल्यानंतर एनआयएने त्याला हैदराबाद येथील चेरलापल्ली कारागृहात हलवले होते.