म्हापसा बाजारपेठेत हमालाचा खून

0
254

म्हापसा येथे भरवस्तीत एका हमालाच्या डोक्यावर दंडुका हाणून त्याचा खून केल्याची घटना काल दुपारी १ च्या दरम्यान घडली. मयत व्यक्तीचे नाव राहुल बंगाली (३२, पश्चिम बंगाल) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पितांबर मलीक (३५, ओडिसा) याला अटक केली आहे.
म्हापसा पोलिसांनी संशयिताला घटनेनंतर तासाभरात बाजारपेठेत अटक केली. पोलिसांनी सांगितले की दोघेही म्हापसा बाजारपेठेत हमालीचे काम करत होते. पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यावसान खुनात झाले. काल दुपारी राहुल एका महिलेसोबत जेवण करत असताना संशयित तिथे आला व त्याचा राहुलशी वाद झाला. त्यानंतर त्याने राहुलच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार केला.