Home बातम्या म्हादई लवादाची आणखी स्थळांना भेट

म्हादई लवादाची आणखी स्थळांना भेट

0
म्हादई जललवादाने काल आणखी काही स्थळांना भेट दिली. यात कुंभारजुवे कालवा, मुरगाव बंदर, कुठ्ठाळी परिसर, पणजी जेटीचा समावेश होता. कर्नाटक सरकारने कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम सुरू केल्याने त्याचा गोव्यावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी लवाद गोव्यात आला आहे.

आज लवाद विर्डी धरणाला भेट देणार आहे. १८ रोजीपर्यंत लवादाचे गोव्यात वास्तव्य असेल. निवृत्त न्या. जे. पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लवादाच्या पथकात गोव्याचे ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी, कर्नाटकचे ऍडव्होकेट जनरल यांच्यासह १२ जणांचा समावेश आहे.