म्हादई : जोड याचिका सादर करण्यास गोव्याला अनुमती

0
81

>> पुढील सुनावणी २१ मार्चला

 

म्हादई पाणीतंटा प्रश्‍नी काल नवी दिल्लीत जल लवादासमोर झालेल्या सुनावणीवेळी कर्नाटकाबरोबर गोव्यालाही नव्याने जोड याचिका व सादरीकरणास लवादाने मंजुरी देेत पुढील सुनावणी २१ मार्चला निश्‍चित केली.
काल झालेल्या सुनावणीवेळी कर्नाटकाच्या साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यासाठी गोव्याचे पथक पूर्ण तयारीनिशी सज्ज होते. कायदेतज्ज्ञ ऍड. आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लवंदे यांनी प्रभावी युक्तिवाद करताना कर्नाटकाने नवीन याचिका व नव्या मुद्यांसह अहवाल सादर केल्याने तीव्र आक्षेप घेतला. यावेळी लवादानेही कर्नाटकाला बरेच फैलावर घेतले. गोव्यालाही जोड याचिका व सादरीकरणास मंजुरी द्यावी अशी मागणी गोव्यातर्फे करण्यात आली. ती लवादाने मान्य केली.
लवादाने दोन्ही बाजूंना समान न्याय देत दोन्ही राज्यांना त्यांची बाजू मांडण्यास वेळ देण्याचे मान्य केल्याने कालची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.