म्हादई : गोव्यातर्फे प्रभावी युक्तिवाद

0
84

>> कर्नाटकाची जोड याचिका

 

म्हादई प्रश्‍नी काल गोव्यातर्फे ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी कर्नाटकाने केलेले दावे खोडून काढणारे मुद्दे प्रभावीपणे मांडल्याने पाणी वळविण्याच्या कर्नाटकाच्या मागणीला धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे कर्नाटकाचे वरिष्ठ वकील फली नरीमन यांनी पुन्हा जोड याचिकेद्वारे नवे मुद्दे सादर केले आहेत. लवादाने या प्रकरणी निवाडा राखून ठेवला असून उद्या पुढील सुनावणी होणार आहे.
काल ऍड. नाडकर्णी यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करताना कर्नाटकाने पाणी वळवण्यासाठी केलेले दावे माहिती सादर करून कसे खोटे आहेत हे लवादाच्या नजरेस आणून दिले.
कोणत्याही अभयारण्य क्षेत्रात येणारे पाणी अडवता येत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अभयारण्यातील वन्यजीव व वनस्पती रक्षणासाठी केंद्राने खास कायदा केलेला आहे. त्यामुळे कर्नाटकाने म्हादई अभयारण्यातून जाणार्‍या पाण्याला वळवण्याचा केलेला प्रयत्न बेकायदा आहे. पाणी वळवण्यात आले तर गोव्यात पिण्याच्या पाण्याचे व शेती सिंचनावर भीषण परिणाम होणार असल्याचा युक्तीवाद ऍड. नाडकर्णी यांनी
केला.