मोप विमानतळाला पर्रीकरांचे नाव देण्यास ‘मगो’चा पाठिंबा

0
15

मोप येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयाला सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या मगोने काल आपला पाठिंबा दर्शवला.

मगो पक्षाचे सचिव अनंत नाईक यांनी मोप विमानतळाला मनोहर पर्रीकरांचे नाव देण्याच्या भाजपच्या निर्णयाला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे मंगळवारी जाहीर केले. पक्षाच्या केंद्रीय समितीने जरी या विमातळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केलेला असला, तरी आम्ही आता केंद्र सरकारने या विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे ठरवले असल्याचे नाईक यांनी काल स्पष्ट केले.