भारताचा विकास दर ६.९ टक्क्यांपर्यंत वाढणार

0
10

जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) विकास दर अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.९ टक्के केला आहे. जागतिक बँकेने नुकताच आपला ताजा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार अमेरिका, युरोझोन आणि चीनमधील घडामोडींचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. भारत चालू आर्थिक वर्षात सरकार ६.४ टक्क्यांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई ७.१ टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. बिघडलेल्या बाह्य वातावरणात २०२२-२३ या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर ६.९ टक्के असू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.