Home बातम्या मोपा व माध्यम प्रश्‍नावर कुठ्ठाळी पोटनिवडणूक लढवणार

मोपा व माध्यम प्रश्‍नावर कुठ्ठाळी पोटनिवडणूक लढवणार

0

पोर्तुगिजांपासून गोवा मुक्तीसाठी हा नागरी उड्डाण विमानतळ नौदलाच्या ताब्यात दिला गेला होता व त्यानंतर चीनने भारतावर आक्रमण केले होते. त्यासाठी संरक्षणासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी त्यांच्याकडे तात्पुरता ताबा दिला होता. त्यानंतर नौदलाकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तो ताब्यात घ्यायला हवा होता. यासाठी माजी मंत्री स्व. माथानी साल्ढाणा यांनी प्रयत्न केले होते.

मोपा विमानतळ तयार झाल्यानंतर तो नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे नागरी विमान उड्डाणासाठी राहील व दाबोळी नौदलाकडे राहील अशी भीती चर्चिल आलेमांव व राधाराव ग्रासियस यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास त्या विमानतळाचा फायदा महाराष्ट्राला होईल. गोवा प्रमुख पर्यटन केंद्र असूनही, त्याचा फायदा गोव्याला न होता महाराष्ट्राला होईल. पर्यटन हा गोव्याचा आर्थिक कणा आहे. त्यावर टॅक्सीचालक, शॅक्स, हॉटेल व इतर छोटेमोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. करोडो रुपयांचा महसूल मिळतो त्याला मुकावे लागणार आहे असे ते म्हणाले. छोट्याशा गोव्याला दोन विमानतळ परवडणारे नाहीत. व संरक्षण मंत्रालय तशी परवानगी देणार नाही. सरकारने मोपा विमानतळ नेव्हीसाठी उपयोगात आणावा व दाबोळी नागरी उड्डाण सेवेसाठी ठेवावा व तसे करणार असल्याने आताच जाहीर करावे असेही चर्चिल आलेमांव म्हणाले.

नेव्हीने बेकायदेशीरपणे दाबोळी विमानतळ आपल्या ताब्यात ठेवला असून तो त्यांच्याकडून काढून घ्यावा अशी मागणी त्यानी केली. माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांच्या मोपा विमानतळाला विरोध केला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दोन्ही विमानतळ विमान उड्डाणासाठी चालू राहतील असे जाहीर केलेले असेल त्यावर आमचा विश्वास नसून, त्यावर मुख्यमंत्री पर्रीकर सरकारची बाजू स्पष्ट करावी. यावेळी त्यानी बंगळूर येथील उदाहरण दिले. नवा विमानतळ तयार झाल्यानंतर जुना विमानतळ बंद केला गेला आहे तशी स्थिती दाबोळीची होईल असे ते पुढे म्हणाले. माथानी साल्ढाणा याची पत्नी एलिना यांनी विमानतळासंबंधी आपली भूमिका जाहीर करावी. तसे केल्यास आम्ही कुठ्ठाळी निवडणुकीत पाठिंबा द्यायला तयार आहोत असेही राधाराव यांनी सांगितले.

इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान देणारे परिपत्रक, मागे घेण्याचा निर्णय योग्य नसून, जनतेची दिशाभूल करणारा आहे. खरोखरच या शाळांना मुख्यमंत्र्याचा पाठिंबा असेल तर परिपत्रक मागे घेतले नसते. एलिना साल्ढाणा यानी मोपा संबंधी भाजपाच्या भूमिकेला विरोध करावा असा सल्ला राधाराव ग्रासियश यानी दिला. तसे केल्यास विरोधी सर्व पक्षाचा त्यांना निवडणुकीत पाठिंबा असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.