मोदींकडून मैत्रीपूर्ण व्यापारी  वातावरणाचे आश्‍वासन ङ्ग

0
138

अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेतील बलाढ्य कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी (सीईओ) चर्चा केली. भारत व्यापारासाठी नेहमी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करेल, असे आश्‍वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले.
यावेळी संरक्षणविषयक कंपनी बोईंगचे सीईओ जेम्स मॅकनेर्ने यांनी भारताबरोबर व्यापार वाढविण्याची इच्छा व्यक्त केली.
पेप्सीको, सिटीग्रुप, गुगल, कार्गिल, कार्लाइल समूह आदी बलाढ्य ११ कंपन्यांच्या सीईओंसोबत मोदींची चहापार्टी झाली.
सुमारे ८७ अब्ज डॉलर्स वार्षिक उलाढाल असलेल्या बोइंग कंपनीचे गेली ७० वर्षे भारताशी व्यवहार आहेत. संरक्षण तसेच इतर विमान वाहतूकीतही कंपनीची उपस्थिती आहे.