मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

0
220

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल सुटका करण्यात आली आहे.
जामीनावर सुटका झालेल्यांमध्ये शैलेंद्र वेलिंगकर, विश्‍वेश परब व कल्पेश गावकर यांचा समावेश आहे. शेळ – मेळावली येथील आयआयटी जमिनीचे सीमांकन करताना गेल्या ६ जानेवारीला हिंसाचारार झाला होता. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार करावा लागला. त्यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत स्थानिक महिला, स्थानिक ग्रामस्थ, तसेच काही महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी २३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविले आहे.

मेळावली प्रकल्प विरोधकांना
म्हावशीच्या ग्रामस्थांचा पाठिंबा

म्हावशी गावच्या सुमारे ३०० ग्रामस्थांनी काल शेळ-मेळावलीला मोर्चा नेऊन तेथील ग्रामस्थांना आपला पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच मेळावलीतील लोकांचा विरोध असताना सरकार तेथे आयआयटी प्रकल्प उभारू पाहत असल्याबद्दल निषेध व्यक्त केला. म्हावशीचे ग्रामस्थ वाळपई येथे पोचले असता पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपला मोर्चा मेळावलीला वळवला. दरम्यान, मेळावलीतील स्थितीचा आढावा घेणार असे ट्वीट विश्‍वजित राणे यांनी केले आहे.