मॅचफिक्सिंगसाठी उमरने टाकला दबाव

0
122

>> झुल्करनैन हैदरचा गौप्यस्फोट

पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज झुल्करनैन हैदर याने पाकिस्तानच्या उमर अकमल याच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत उमर अकमल याने सामने हरण्यासाठी आपल्यावर खराब प्रदर्शनाचा दबाव टाकला होता. परंतु, आपण नकार दिल्यामुळे जीवे मारण्यासाठी आपल्याला सातत्याने धमकीचे फोन येणे सुरू झाल्याचे हैदर याने सांगितले. मालिकेतील तिसर्‍या सामन्यात ड्रिंक्स घेऊन आल्यावर उमरने खराब कामगिरी करण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट हैदरने केला. त्यावेळी संघ व्यवस्थापनाला याची कल्पनादेखील दिली होती. परंतु, याचा काडीमात्र फायदा झाला नव्हता असे सांगत हैदरने पीसीबीवर टीकास्त्र सोडले आहे.

हैदरच्या या आरोपामुळे उमर अकमल अधिक संकटात सापडणार आहे. धमक्यांमुळे आपण दुबईतील हॉटेल सोडून लंडनला रवाना झाल्याने हैदर म्हणाला. मालिकेतील पाचवा सामना सुरु होण्यापूर्वी हैदरने कोणतीही पूर्वकल्पना न देता हॉटेल सोडले होते. त्यावेळी मोठी गडबड झाली होती. यानंतर हैदर लंडनमध्ये असल्याचे समजले होते. २०११ साली हैदर पाकिस्तानमध्ये परतला होता.