मुळगावात पेठेचा जत्रोत्सव

0
106

>> हजारो भाविकांची उपस्थिती : कौल घेण्यासाठी गर्दी 

हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुळगाव येथील श्री केळबाई देवीच्या पेठेच्या जत्रोत्सवानिमित्त शनिवारी हजारो भाविकांनी पेठेचे दर्शन घेऊन देवीचा कौल घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सुखी संसारासाठी प्रार्थना करून देवीचा कौल घेतला.
काल मये येथील माल्याची जत्रा झाल्यानंतर मयेतून रात्रौ पारंपरिक वाटेने पेठ शनिवारी पहाटे मुळगावात पोचली. तिथे विसावा घेतल्यानंतर सकाळी राऊत, गाड, परब व घाडवंसला कौल देण्यात येतो. मग पेठ वाजत गाजत व्रतस्थ धोंडांच्या उपस्थितीत मंदिरात आणण्यात येते.
या ठिकाणी सार्वजनिक कौल दिला जातो. यावेळी हजारो भाविकांनी कौलासाठी गर्दी केली होती. त्यानंतर समाजातील लोकाना कौल दिल्यानंतर भक्तगण धोंडाना कौल दिला जातो. त्यानंतर व्रतस्थ धोंड गळ्यातील वळेसर काढून रुमडाच्या (औदुंबरांच्या) झाडावर ठेवतात. स्नान करून देवीचे दर्शन घेतात. त्यानंतर सायंकाळी दीपोत्सव होतो. रात्रौ नाटक सादर करण्यात येते.
या पेठेत ब्रह्मा, विष्णू, महेश, नंदी यांच्या मूर्ती असतात व वाटेकरू फुलांनी पेठ सजवतात. पाच दिवस ही पेठ ठेवण्यात आल्यानंतर पाचव्या दिवशी देवाचा मंदिरात प्रवेश होतो. काल हजारो भाविकांनी मुळगावात गर्दी केल्याने मंगलमय वातावरणाची अनुभूती दिसून आली.