Home Featured मुलींच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

मुलींच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

0

कोलवाळ पोलीस स्थानकात गेल्या 5 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अरबाज खान (20, कुंभारवाडा, शेळपे धुळेर) आणि साबीर बेटागेरी (26, रा. व्हडलेभाट ताळगाव) यांना अटक केली आहे. या प्रकरणी इतर इब्रानशाह, सिराजुद्दीन एम शाह (26, घोटणीचा व्हाळ कोलवाळ) आणि सुभाष कुमार ऊर्फ मायाराम कुमार (26, इब्रानशाह, घोटणीचा व्हाळ कोलवाळ) हे दोघे संशयित फरारी आहेत. पोलिसांत तक्रार दाखल केल्यापासून कोलवाळ पोलीस संशयितांच्या शोधात होते. दि. 24 रोजी उशिरा पोलिसांनी संशयितांना अटक केली व त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.