मुख्यमंत्र्यांविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य; एकाविरुद्ध गुन्हा

0
3

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात द्वेष, अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर याच्या विरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा काल दाखल केला. येथील आझाद मैदानावर 19 फेब्रुवारी रोजी रामा काणकोणकर व इतरांनी सांकवाळ येथील पंचायतीमध्ये घडलेल्या एका घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामा काणकोणकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे द्वेषपूर्ण व अपमानास्पद वक्तव्य केले होते. या प्रकरणी पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रामा काणकोणकर याला नोटीस जारी केली आहे. दरम्यान, रामा काणकोणकर याने पणजी पोलीस स्थानकात काल हजेरी लावली. त्यानंतर पोलिसांनी त्याची जबानी नोंदवून घेतली