मुख्यमंत्र्यांनी कावरेवासियांचे म्हणणे न ऐकल्याचा आरोप

0
64

कावरे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल चर्चेसाठी बोलावले खरे. मात्र, आमचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नाही तसेच एकही मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले नाही, असे कावरे येथील ग्रामस्थांचे नेते रवींद्र वेळीप यांनी काल मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर बोलताना सांगितले.
कावरे येथे खाणींवर जे गैरकारभार चालू आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत. तेथील खाण उद्योगात सुसूत्रता यावी यासाठी ग्रामस्थांच्या सहभागाने सहकारी सोसायटीची स्थापना करण्यात यावी, कावरे गावातील वनक्षेत्राचे व पर्यायाने पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे, तसेच आपणाला तुरुंगात असताना जी मारहाण झाली होती त्याची चौकशी करण्यात यावी अशा आमच्या शिष्टमंडळाच्या मागण्या होत्या. मात्र, त्याबाबत कोणतेही आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नसल्याचे रवींद्र वेळीप म्हणाले.
ग्रामस्थांच्यावतीने आपण व सुहास वेळीप यांनी चर्चेत भाग घेतला तर मुख्यमंत्र्यांबरोबर सांगेचे आमदार सुभाष ङ्गळदेसाई, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे होते. त्याशिवाय खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य, उपसंचालक पराग नार्वेकर व ङ्गोमेंतो कंपनीचे अधिकारी बैठकीला हजर होते. ही बोलणी निष्ङ्गळ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता पुढील कृती उद्या ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊनच ठरवण्यात येणार असल्याचे रवींद्र वेळीप यांनी स्पष्ट केले.

कावरे येथील खाणीवरून कायदेशीररित्या उत्खनन करून काढलेल्या खनिज मालाची वाहतूक करताना तो अडवता येणार नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत कावरे येथील शिष्टमंडळाला सांगितले असतानाही काल मंगळवारी कावरे गावातील लोकांनी खनिज मालाची सगळी वाहतूक अडवून धरल्याचा आरोप सांगेचे आमदार सुभाष ङ्गळदेसाई यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. त्यांच्या या कृत्यामुळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे नाराज झाले असल्याचे ते म्हणाले. कावरे गावातील काही आदिवासी लोकांनी आणखीही काही गैरकृत्ये केलेली असून त्याचाही आपण लवकरच पर्दाङ्गाश करणार असल्याचे ङ्गळदेसाई यांनी सांगितले.