आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवा

0
62
  • उच्च न्यायालयाचा बीसीसीआयला सल्ला

महाराष्ट्रात दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पुणे व मुंबईतील आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवा असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने काल बीसीसीआयला दिला. न्या. व्ही. एम. कानडे व एम. एस. कर्णिक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने वरील निवाडा देताना क्रिकेट मंडळ मुख्यमंत्री मदत निधीसाठी योगदान देण्यास तयार असल्याची विचारणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला यासंबंधी आज उत्तर देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
बीसीसीआयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रत्येक दिवशी आयपीएल सामने खेळण्यात येणार्‍या मैदानासाठी ४० लाख लीटर पाणी पुरविले जात असल्याचे सांगितले होते.
तितकेच पाणी दुष्काळग्रस्त गावे व पुणे परिसराला पुरविणे मंडळाला शक्य आहे का असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर खेळपट्टींच्या देखभालीसाठी केला जात असल्याचे क्रिकेट मंडळाने न्यायालयाला सांगितले आहे. सुनावणीवेळी बीसीसीआयतर्फे ऍड. रफिक दादा यांनी बाजू मांडताना आयपीएल सामन्यांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरविण्यासाठी रॉयल वेर्स्टन इंडिया टर्फ क्लबशी करार केल्याची माहिती न्यायालयासमोर दिली. ९ सामने पुण्यात तर ८ मुंबईत खेळविण्यात येणार आहेत. नागपुरात खेळले जाणार असलेले तीन सामने मोहालीत खेळले जाऊ शकतात असे त्यांनी न्यायालयात सांगितले. खेळपट्‌ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात असल्याने उच्च न्यायालयाने क्रिकेट मंडळाला गेल्या सुनावणीवेळी फटकारले होते.

यंदा सरासरीपेक्षा
जास्त पावसाचा अंदाज
६ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रासह दुष्काळाचा सामना करणार्‍या दहा राज्यांना ही दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भातही चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही काल देशभरात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेट व भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात साम्य आहे.