मुख्यमंत्र्यांना वाढदिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

0
22

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिनानिमित्त ट्विटर संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे गोव्याचा कायापालट करण्यासाठी चांगल्या प्रशासनाकरिता वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आघाडीवर आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. आपले नेतृत्व आणि पाठिंबा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अंत्योदय तत्त्वावर काम करून राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी स्फूर्ती देतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आभार प्रकट करणार्‍या संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत वाढदिनी नागरिकांसाठी प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध नव्हते. केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, भाजप नेते, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना समाजमाध्यमांतून शुभेच्छा दिला आहेत.