Home बातम्या मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनीघेतली राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनीघेतली राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

0

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नवी दिल्ली भेटीमुळे राजकीय पातळीवर विविध चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांनी यांनी दामू नाईक यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय स्थिती आणि भाजप पक्ष संघटनेशी संबंधित विविध विषयांवर काल चर्चा केली. या भेटीत गोव्यातील भाजपची आगामी राजकीय रणनीती, फोंडा पोटनिवडणूक रद्द प्रकरण, राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागा आदी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी पक्षाची संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविणे तसेच, राज्यात सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.