मुख्यमंत्री पर्रीकर गोमेकॉत दाखल

0
144

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना रविवारी संध्याकाळी थोडासा डिहायड्रेंशनचा त्रास जाणवू लागल्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती चांगली असून उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री पर्रीकर डिहायड्रेशनवर घरीच उपचार घेत होते. परंतु, जीएमसीच्या डॉक्टरांनी हॉस्पितळमध्ये उपचार करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणखाली ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांना गेल्या बुधवारी पहिल्यांदा पोटात त्रास जाणवू लागल्याने त्यांना बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली होती. येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये तपासणी करून सात दिवस वैद्यकीय उपचार घेऊन अचानक गुरूवारी दुपारी गोव्यात दाखल झाले होते. तसेच त्यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता.
मुख्यमंत्री पर्रीकर यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने शुक्रवारपासून निवासस्थानातून सरकारी कामकाज हाताळण्यास सुरूवात केली होती.