Home बातम्या मुख्यमंत्री पर्रीकर आज जाणून घेणार जीएसटीसंदर्भात व्यापार्‍यांच्या तक्रारी

मुख्यमंत्री पर्रीकर आज जाणून घेणार जीएसटीसंदर्भात व्यापार्‍यांच्या तक्रारी

0
मुख्यमंत्री पर्रीकर आज जाणून घेणार जीएसटीसंदर्भात व्यापार्‍यांच्या तक्रारी

व्यावसायिक आणि कर खात्यातर्फे बुधवार दि. ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मिनेझिस ब्रागांझा सभागृहात (आयएमबी) जीएसटी तक्रारीच्या संदर्भात व्यापारी व विक्रेत्यांसाठी खास सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहून तक्रारी जाणून घेणार आहेत.

जीएसटी अंमलबजावणी दरम्यान निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जुलै २०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली लागू केली आहे. राज्यातील सुमारे २६ हजार व्यावसायिक जीएसटीमध्ये समाविष्ट झाले आहेत. जीेएसटीमघ्ये राज्याला दहा ते पंधरा टक्के अधिक आर्थिक लाभ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जीएसटीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.