इफ्फीनिमित्त पणजीत मिरामार समुद्र किनारा व आल्तिनो पणजी येथील जॉगर्स पार्क अशा दोन ठिकाणी एकूण १४ जुने-नवे चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली.
येत्या दि. २१ ते २६ नोव्हेंबर दरम्यान राज्यात इफ्फी होणार असून त्याच काळात हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यंदाचे वर्ष हे इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने ही सोय करण्यात आली आहे. २१ पासून २६ नोव्हेंबरपर्यंत दाखवण्यात येणार असलेले चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत – जॉगर्स पार्क आल्तिनो पणजी येथे चलती का नाम गाडी (१९५८), पडोसन (१९६८), अंदाज अपना अपना (१९९४), हेराफेरी (२०००), चेन्नै एक्सप्रेस (२०१३), बधाई हो (२०१८), टोटल धमाल (२०१९).
मिरामार किनार्यावर दाखवण्यात येणार असलेले चित्रपट खालीलप्रमाणे आहेत – नाचूया कुम्पासार (कोकणी), सुपर-३० (हिंदी), आनंदी गोपाळ (मराठी), ऊरी-धी सर्जिकल स्ट्राईक (हिंदी), हेलारो (गुजराती), गली बॉय (हिंदी), एफ्-२ फन ऍण्ड फ्रस्ट्रेशन (तेलगु). आल्तिनो व मिरामार समुद्र किनारा येथे दाखवण्यात येणार असलेल्या या स्क्रिनिंग कार्यक्रमाचे ‘धी जॉय ऑफ सिनेमा’ असे नामकरण करण्यात आले आहे.