माशे-काणकोणातील अपघातात युवती ठार

0
8

काणकोण माशे येथे रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात दिया दिगंबर नाईक (20) या युवतीचा जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या अपघातात रोहन पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. दिया नाईक आणि रोहन पाटील हे दोघेही मूळ कर्नाटक येथील असून ते वेर्णाहून कर्नाटकला जात असताना हा अपघात झाला. रस्त्यावर पडलेल्या मासे वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील पाण्यावर दुचाकी घसरून हा अपघात झाला. यावेळी सदर दुचाकी घटनास्थळी पोहोचताच तोल जाऊन घसरली आणि दुचाकीवरील दिया नाईक ही रस्त्यानजीकच्या विजेच्या खांब्यावर जाऊन आदळली. त्यात दिया हिचे डोके खांबाला धडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर रोहन पाटील हा जखमी झाला. यावेळीही दिया नाईक आणि रोहन पाटील यांची दुचाकी या पाण्यावरून घसरल्याचे प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.