Home बातम्या मारिओ मिरांडा यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’

मारिओ मिरांडा यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’

0

‘पद्म’किताबांच्या मानकर्‍यांत यावर्षी १९ महिलांचा समावेश आहे.

‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित झालेल्यांत अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता धर्मेंद्र, मीरा नायर, प्रख्यात ह्रदयरोगतज्ज्ञ देवी शेट्टी, ज्येष्ठ सनदी अधिकारी एन. विठ्ठल, रोनेन सेन आदींचा समावेश आहे.

‘पद्मश्री’ किताब मिळालेल्यांमध्ये वनराज भाटिया, झिया फक्रुद्दिन डागर, सतारवादक शाहीद परवेझ, लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर, नाटककार सतीश आळेकर, मध्य प्रदेशचे गुंदेचा बंधू, भजनसम्राट अनुप जलोटा, दिग्दर्शक प्रियदर्शन, पुण्याचे उद्योगपती अरुण फिरोदिया, डॉ. स्वाती पिरामल, क्रीडापटू लिंबाराम, महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर वैद्य, आदींचा समावेश आहे.