मायनिंग पीपल्स फ्रंटचा ८ रोजी पणजीत मोर्चा

0
225

गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने कोडली तिस्क येथे काल घेतलेल्या सभेत सरकारचे प्रलंबित खाण प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या ८ फेब्रुवारीला पणजीत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पणजी येथे कदंब बसस्थानक ते आझाद मैदान दरम्यान शांततेत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आझाद मैदानावर जाहीर सभेत रूपांतर केले जाणार आहे. राज्यातील खाणी लवकर सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती फ्रंटचे निमंत्रक पुती गावकर यांनी दिली.
दरम्यान, गोव्यातील खाण प्रश्‍नी याचिकेवर उद्या दि. ४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात द्विसदस्यीय खंडपीठासमोर व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणी होणार आहे.