मान्सून पुन्हा सक्रिय

0
104

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात आगामी तीन – चार दिवस काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या २८ जून पर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.

दाबोळी येथे मागील चोवीस तासात ५ इंच आणि केपे येथे ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजी आणि मुरगाव येथे साडेतीन इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत १४.८३ इंच पावसाची नोंद झाली असून दाबोळी येथे सर्वाधिक २० इंच पावसाची नोंद झाली आहे.

सध्या ठरावीक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पणजी परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस पडला. तथापि, मंगळवारी दिवसाच्या वेळी पावसाने दडी मारली.