काल मंगळवारी राज्यातील काही भागांत कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काल सकाळी 9 च्या दरम्यान मडगाव शहरात पाऊस कोसळला. तसेच संध्याकाळी काणकोण, गावडोंगरी आदी भागांतही पाऊस कोसळला. मडगाव शहरातही संध्याकाळी पाऊस कोसळला. मंगळवारी राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची तसेच काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती.