Home बातम्या माध्यम धोरणाचे ‘फोर्स’कडून स्वागत

माध्यम धोरणाचे ‘फोर्स’कडून स्वागत

0

गोवा सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा जो निर्णय घेतला आहे त्याचे फोर्सने स्वागत केले आहे. सरकारने योग्य धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व घटकांतील मुलांना शिक्षणाची संधी दिली असे फोर्सचे निमंत्रक प्रेमानंद नाईक यांनी म्हटले आहे. पालकानी संघटीत राहून न्याय मागण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

दक्षिण गोवा जि. पं.कडूनही स्वागत

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत गोवा सरकारने माध्यमाविषयी जो धोरणात्मक निर्णय घेतला त्याचे स्वागत केले. आज जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा मारिया रिबैलो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक भरली होती. जिल्हा पंचायतीत अधिकार देण्याच्याबाबतीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली आहे व सहा महिन्यांत त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच कदंबा बसस्थानकालगत नूतन जिल्हाधिकारी प्रशासकाची इमारत बांधण्यात येत आहे. इमारतीत जिल्हा पंचायतीच्या कार्यालयासाठी जागा देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री पर्रीकर यानी दिल्याचे अध्यक्षानी सांगतिले. त्याबैठकीत विविध विकास कामावर चर्चा झाली.