माडाला राज्य दर्जा कार्यवाही सूचना जारी

0
122

सोमवार १६ ऑक्टोबर २०१७ पासून माडाला राज्य झाडाचा दर्जा मिळणार आहे. गोवा झाड संवर्धन (दुरूस्ती) कायदा २०१७ विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आला होता. या कायद्याच्या कार्यवाहीबाबतची सूचना अवर सचिव शैला भोसले यांनी जारी केली आहे.

भाजप आघाडी सरकारच्या कार्यकाळात माडाला झाडाच्या व्याखेतून वगळण्यात आले होते. त्यावेळी माडाच्या संवर्धनासाठी आंदोलन सुध्दा छेडले होते. गोवा फॉरवर्डने सत्तेवर आल्यानंतर माडाला पुन्हा झाडाचा दर्जा देण्यासाठी जोर लावला होता.

दरम्यान, महिला व बाल कल्याण खात्यातर्फे लाडली लक्ष्मी योजनेअर्तंगत सुमारे ९०० अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच गृह आधार योजनेअर्तंगत ८०० अर्जांच्या कार्यवाहीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती खात्याच्या अधिकार्‍यांनी काल दिली.