माजी कोळसा राज्यमंत्र्यांना तीन वर्षांचा कारावास

0
75

अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील कोळसा राज्यमंत्री दिलीप राय यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काल तीन वर्षांच्या कारावासाची सजा सुनावली. वीस वर्षांपूर्वीच्या झारखंड येथील कोळसा ब्लॉक वाटप घोटाळ्याप्रकरणी ही सजा सुनावण्यात आली आहे.
राय यांना गेल्या १४ ऑक्टोबर रोजी वरील प्रकरणात दोषी धरण्यात आले होते. न्यायालयाने आपला निवाडा कालपर्यंत राखून ठेवला होता. झारखंड कोळसा वाटप घोटाळा घडला तेव्हा राय हे कोळसा खात्याचे स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री होते.