Home बातम्या माजी आमदाराचा अपघातात मृत्यू

माजी आमदाराचा अपघातात मृत्यू

0

लातूरच्या औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ कार उलटून झालेल्या भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात काल सायंकाळी 4च्या दरम्यान घडला. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात 2014 ते 2019 साली आमदार होते. देशमुख हे आपल्या कारने (क्र. एमएच-44-एडी-2797) तुळजापूरमार्गे लातूरकडे येत होते. बेलकुंडनजीक असलेल्या उड्डाणपुलावरून काही अंतरावर कार पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर पडले. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला.