महिला अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकप पुढीलवर्षी

0
128

कोरोना विषाणूंमुळे पुढे ढकलण्यात आलेली १७ वर्षांखालील महिलांची भारतात होणारी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा आता पुढीलवर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत होणार आहे. परिस्थितीतून सावरण्यासाठी लागणारा कालावधी ध्यानात ठेवून फिफाने हा निर्णय घेतला आहे. यंदा २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा नियोजित होती.

परंतु, संपूर्ण क्रीडाविश्‍वाला ब्रेक लागलेला असल्यामुळे फिफाने स्पर्धा तीन महिन्यांनी पुढे ढकलणे योग्य समजले आहे. पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात न आल्यामुळे खेळाडूंनी सुस्कारा सोडला आहे. १ जानेवारी २००३ ते ३१ जानेवारी २००५ या कालावधीत जन्मलेलेच या स्पर्धेत खेळू शकणार आहेत. स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार असून पाच वेगवेगळ्या मैदानांवर स्पर्धेतील सामने खेळविण्यात येणार आहेत.