राज्यातील महिलांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी पिंक फिमेल फोर्स कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. पोलीस अधिकार्यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यम सचिव परिमल राय, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
गोवा पोलिसांकडून चांगले कार्य केले जात आहे. गोवा पोलीस गुन्ह्यांच्या तपासकामात आघाडीवर आहेत. आता गुन्हे टाळण्यासाठी उपाययोजनांचा विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांच्या विरधातील गुन्हेगारांना आळा घालण्यावर भर देण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले.