महापौरांच्या कारला पोलिसांनी ठोकले टाळे

0
75

पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या कारला काल येथील वाहतूक पोलिसांनी कुलूप ठोकले. शहरातील साउथ इंडियन बँकेसमोर ‘नो पार्किंग’ विभागात त्यांची कार पार्क करून ठेवली असता पोलिसांनी कारवाई करताना कारच्या चाकाला कुलूप ठोकले. यावेळी महापौर तिथे नव्हते. चालकाने कारवाईनंतर लगेच तेथून पलायन केले.