Home बातम्या महत्वाच्या सणांना राज्यदर्जा देण्यासाठी अभ्यासाची गरज

महत्वाच्या सणांना राज्यदर्जा देण्यासाठी अभ्यासाची गरज

0

राज्यातील काही महत्वाच्या सणांना राज्य उत्सवाचा दर्जा देण्यासाठी त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्‍वासन पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी दिले. त्यानंतर सांतआंद्रेचे आमदार विष्णू सुर्या वाघ यांनी आपला ठराव मागे घेतला. शिरगावची जत्रा, काणकोण येथील शिशारान्नी, जांबावलीचा गुलालोत्सव, यासारखे अनेक सण असून या सणांना राज्यउत्सव म्हणून दर्जा दिल्यास सरकारतर्फे मदत देणे शक्य होईल, वाघ यांचे म्हणणे होते.