Home बातम्या मसूद अझहरचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पलायन?

मसूद अझहरचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पलायन?

0

ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या हवाई दलाने एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूरमधील मुख्यालय जमीनदोस्त केले. या एअर स्ट्राईकमधून जैशचा म्होरक्या मसूद अझहर थोडक्यात बचावला असून त्याने सध्या पलायन केले असून तो सध्या पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानात दिसून आला. हा भाग त्याचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरपासून 1000 किलोमीटर दूरवर आहे. भारतीय सैन्याने 6-7 मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. बहावलपूरमधील जैशचे मुख्यालय भारताच्या कारवाईत बेचिराख झाले. त्यात अझहरचे किमान 10 जवळचे नातेवाईक मारले गेले. त्यामुळे तिथून अझहरने पलायन केले असून तो गिलगिट-बाल्टिस्तानच्या स्कार्दूमधील सदपारा रोड परिसरात दिसून आला. गोपनीय माहितीच्या आधारे मसूदच्या ठावठिकाणा देण्यात आला आहे.