Home बातम्या मशीनची धडक बसल्यामुळे मुरगाव बंदरात एकाचा मृत्यू

मशीनची धडक बसल्यामुळे मुरगाव बंदरात एकाचा मृत्यू

0

रविवारी रात्री मुरगाव बंदरात फोर्कलिफ्ट मशीनची धडक बसून ज्ञानेश हरमलकर (53, सडा) यांचा मृत्यू झाला. मुरगाव पोलिसांनी चालक मोहम्मद फुराकान खान (उत्तर प्रदेश) याने फोर्कलिफ्ट मशीन बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवत हरमलकर यांना धडक देत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

ज्ञानेश हरमलकर यांना मुरगाव बंदराच्या धक्का क्रमांक 11 वर फोर्कलिफ्टने धडक दिली. मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक खान याने फोर्कलिफ्ट बेफिकीरपणे मागे घेताना हरमलकर यांना धडक दिली. त्यामुळे हरमलकर यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. काल सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हरमलकर हे मुरगाव बंदरात डेल्टा कंपनीमध्ये कामाला होते.