मध्य प्रदेशच्या सिढी येथे एक प्रवासी बस कालव्यात पडून झालेल्या दुर्घटनेत ४५ प्रवासी मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये २१ पुरुष, १८ महिला व एक बालक आहे. सात जणांना वाचवण्यात मदत यंत्रणांना यश आले.
५४ प्रवाशांनी खच्चून भरलेली ही बस सतनाहून सिढी येथे जात असता रामपूर भागात सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी चालकाने दुसरा मार्ग अवलंबला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.