फोनवरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवी यंत्रणा

0
66

फोनवर संपर्क साधून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी भारत सरकारने डिजिटल गुप्तचर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार मंत्रालयाने ही घोषणा नुकतीच केली. अशा प्रकरणांच्या जलद तपासासाठी ही संस्था काम करील. दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अशा प्रकारच्या वाढत्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी काय करता येईल याच्या विविध पर्यायांवर विचारविनिमय झाला.

डिजिटल गुप्तचर संस्थेचे प्रमुख काम विविध तपासयंत्रणा, वित्तीय संस्था आणि दूरसंचार कंपन्यांमध्ये अशा गुन्ह्यांच्या तपासकामाबाबत समन्वय निर्माण करणे हे असेल. गैरव्यवहार रोखण्यासाठी टेलिकॉम ऍनॅलिटिक्स तसेच ग्राहक संरक्षण व्यवस्था निर्माण केली जाईल असेही सरकारने जाहीर केले आहे. टेलिमार्केटिंग करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेशही दूरसंचारमंत्र्यांनी दिले आहेत.