मणीपूरमध्येही भाजप सरकार

0
73

 

>> बिरेन सिंग मंत्रिमंडळाचा आज शपथविधी

 

मणीपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. भाजप विधीमंडळ नेते एन. बिरेन सिंग आज एका समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास भाजपाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उपस्थित राहणार आहेत.
गोव्याप्रमाणेच मणीपूरमध्येही कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. ६० सदस्यीय विधानसभेत कॉंग्रेसला सर्वाधिक २८ तर त्या खालोखाल भाजपाला २१ जागा मिळाल्या आहेत. तर बहुमतासाठी ३१ आमदारांची गरज आहे. ११ जागा अन्य स्थानिक पक्ष व अपक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत.
असे असले तरी गोव्याप्रमाणेच मणीपूरमध्येही भाजपने अपक्षांसह अन्य स्थानिक पक्षांच्या आवश्यक संख्येतील आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे. एनपीपी व एनपीएङ्ग यांच्या प्रत्येकी चार व लोकजनशक्ती आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रत्येकी एका आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपला जादुई आकडा गाठणे शक्य झाले.
कॉंग्रेसनेही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी हालचाली केल्या. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.