देवाबाग-काणकोणात रशियन युवतीचा ठेचून खून

0
98

>> बलात्कार केल्याचा पोलिसांचा संशय

 

देवाबाग येथे एक निर्जन स्थळी एका रशियन युवतीचा मृतदेह काणकोणच्या पोलिसांना आढळला असून नग्नावस्थेत असलेला सदर मृतदेह काणकोणच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. प्राथमिक अंदाजावरून सदर युवतीवर अतिप्रसंग करून खून केला असावा असा अंदाज आहे. या प्रकरणी काणकोणच्या एका व्यक्तीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.
१४ रोजी सकाळी या घटनेची खबर स्थानिक नागरिक प्रशांत कोमरपंत यानी सर्वप्रथम काणकोण पोलीस स्थानकावर दिली. ़श्री. कोमरपंत या ठिकाणच्या आपल्या शेतावर गेल्यावेळी नग्नावस्थेत पडून असलेली युवती त्याच्या दृष्टीस पडली. त्याची खबर त्याने काणकोणच्या पोलीस स्थानकावर दिल्यावेळी लगेच तपासकार्य सुरू झाले. दक्षिण गोव्याचे पोलीस उपाधीक्ष सॅमी तावारिस, काणकोणचे पो. निरीक्षक फिलोमेना कॉस्टा यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसे तज्ज्ञाला पाचारण करून सर्व जागांचे ठसे घेण्यात आले. ज्या अवस्थेत सदर युवतीचा मृतदेह आढळला. त्याबाबत मारेकर्‍याने कसलाच पुरावा या ठिकाणी सोडलेला नाही. मात्र हे प्रकरण एकटयाचे नसून चार पाच व्यक्तींचे ते काम असायला हवे. त्यावरून आदल्या दिवशी सदर युवती कोणाबरोबर फिरत होती याचा अंदाज काणकोणचे पोलीस घ्यायला लागले असून एका परदेशी युवतीचा अशा प्रकारे संयशास्पद खून होणे या प्रकरणी तपास लावण्याचे फार मोठे आव्हान काणकोणच्या पोलिसांसमोर येऊन पडले आहे. याविषयी वृत्त असे, दुमाणेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक शुक्रवारी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. काल होळी असल्याने त्या रेस्टॉरंटच्या आयोजकांनी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये विदेशी पर्यटक तसेच काही स्थानिक युवकांचा एक गट सामील झाला होता. पहाटेपर्यंत ही पार्टी चालू होती. या पार्टीत बहुसंख्यांनी अंमलीपदार्थांचे सेवन केले होते, अशी माहिती मिळाली आहे. या पार्टीमध्ये ही रशियन युवती सहभागी झाली होती. या रेस्टॉरंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावरून पोलिसांनी शोधून काढले असून, स्थानिक युवकही त्या पार्टीत असल्याचे पोलिसांनी कॅमेर्‍याच्या ङ्गुटेजवरून शोधून काढले आहे.
त्या रशियन युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून, त्यानंतर तिला दगडांनी ठेचून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या युवतीजवळ कोणतेही कागदपत्र सापडला नसल्याने पोलीस तिचा पत्ता शोधत असून ती पाळाळे येथील एक निवासी तंबूत राहात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.