मडगाव बसस्थानक सरकार स्वखर्चाने बांधणार

0
146

गोवा सरकारने मडगांव येथील कदंब बसस्थानक पीपीपी तत्त्वावर न बांधता पूर्णपणे स्वखर्चाने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकार पहिल्या टप्प्यात या बसस्थानकावर ६० कोटी रु. खर्च करणार आहे. त्या बसस्थानकावर जी दुकाने बांधण्यात येतील ती सरकार लिजवर देणार असून त्याद्वारे आपण खर्च केलेले पैसे वसूल करणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल यासंबंधी गोवा साधनसुविधा विकास महामडळाचे अधिकारी, मडगांवचे आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो व कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांच्याबरोबर बैठक घेतली.

३५० कोटी रु. खर्च करुन हे बसस्थानक बांधण्यात येणार असून ३८ हजार चौ. मी. एवढ्या जमिनीत ते उभे राहणार आहे. कॉंग्रेसचे सरकार असताना हे बसस्थानक पीपीपी तत्त्वावर बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.