Home Featured मडगावात सुवर्णकारावर हल्ला; दुकान लुटण्याचा केला प्रयत्न

मडगावात सुवर्णकारावर हल्ला; दुकान लुटण्याचा केला प्रयत्न

0

बोर्डा-मडगाव येथे एका सुवर्णालंकार दुकानात ग्राहक बनून आलेल्या अज्ञात ग्राहकाने सुवर्णकारावर हातोडीने हल्ला करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णकाराने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्याने पळ काढला. काल सायंकाळी 7 च्या सुमारास भर बाजारात ही घटना घडली. या हल्ल्यात सुवर्णकार सोहम रायकर हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
सविस्तर माहितीनुसार, बोर्डा येथील सपना बेरियर इमारतीतील देवराई इंदिरा ज्वेल्स या दुकानात एक व्यक्ती ग्राहक असल्याचे भासवत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आला. त्यावेळी दुकानमालक सोहम रायकर हे एकटेच दुकानात होते. दागिने दाखवताना सोहम यांचे लक्ष नसल्याचे पाहून त्या ग्राहकाने हातोडीने त्यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ला केल्यानंतर सोहम रायकर यांनी प्रतिकार प्रयत्न केला आणि ते दुकानातून बाहेर पडले. यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे त्या ग्राहक बनून आलेल्या त्या चोरट्याने पळ काढला. हे वृत्त समजताच फातोर्डा पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शोध सुरू केला; पण यश आले नाही. पणजी येथून श्वानपथक मागवण्यात आले. तसेच ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.