पुढील विस्तार येत्या आठवड्यात
मंत्रिमंडळात ज्येष्ठ आमदारांना सामावून घेतल्यानंतरच नव्या चेहर्यांचा विचार करण्यात येणार असल्याचे समजते.
आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पुढील आठवड्यात आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सहा मंत्र्यांचे शपथग्रहण झाले होते. मात्र, त्यापैकी पर्यटन व वनमंत्री माथानी साल्ढाणा यांचे निधन झाल्याने शपथग्रहण केलेल्या मंत्र्यांचा आंकडा ५ वर आला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा व जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर असे हे पाच मंत्री आहेत. पुढील टप्प्यात ७ मंत्र्यांचे शपथग्रहण होण्याची शक्यता असून आपणाला मंत्रीपद मिळावे यासाठी भाजपचे विविध मंत्री प्रयत्नरत आहेत.